देवळाली स्कूल ऑफ आर्टिलरीतर्फे चार सप्टेंबरला गोळीबाराची प्रात्यक्षिके; नागरिकांना धोक्याच्या हद्दीत प्रवेश न करण्याचे आवाहन

नाशिक। दि. ३१ ऑगस्ट २०२६: जनरल स्टाफ ऑफिसर, मुख्यालय, तोफखाना (स्कूल ऑफ आर्टिलरी), देवळाली कॅम्प यांच्यातर्फे ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत जीवंत दारुगोळ्याचा वापर करून तोफखान्याची व मैदानी गोळीबाराची प्रात्यक्षिके केली जाणार आहेत. या कालावधीत कोणत्याही व्यक्तीने सदर धोक्याच्या हद्दीत प्रवेश करू नये, कोणास जाऊ देऊ नये तसेच आपली पाळीव जनावरे त्या क्षेत्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, असे अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; सतर्कतेचे आवाहन...

या गोळीबाराच्या सरावामुळे पुढील गावांच्या महसुली हद्दीतील काही भाग तोफांच्या माऱ्याच्या रेषेत येतात. त्यांची नावे अशी : नाशिक तालुका : वंजारवाडी, लहवित रेल्वे स्टेशन. इगतपुरी तालुका : लोहाण, घोटीची वाडी, घोटी खुर्द, नांदगाव, नांदूर वैद्य, साकूर, बेलगाव कुऱ्हे, अस्वली रेल्वे स्टेशन, घोटी खुर्द. या गावांच्या कार्यक्षेत्रामध्ये युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार, तोफखाना यांचा सराव होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर बेकायदा वृक्षतोड; महापालिकेच्या हाती सीसीटीव्ही फुटेज

वरील दिवशी या प्रतिबंधित क्षेत्रात विना परवाना प्रवेश केल्यास किंवा सूचनेचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. तसेच नियम मोडून प्रवेश केल्यामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी केंद्र अथवा उक्त शासनावर राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही अपर जिल्हादंडाधिकारी श्री. राजपूत यांनी नमूद केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790