नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर

नाशिक। दि. २८ ऑगस्ट २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विविध विकासकामांना आणि उपक्रमांना गती मिळत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमासह विविध प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! ई-केवायसीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

मुख्यमंत्री फडणवीस सकाळी १० वाजता नाशिकमध्ये दाखल होतील. त्यानंतर दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल.

दुपारी २.३० वाजता शिवनई येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता सिंहस्थ महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘भक्ती-शक्ती संगम’ कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात ९ हजार ७३१ शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात ८६ कोटी ५१ लाखांचा लाभ

मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरासह संबंधित मार्गांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक व्यवस्थेबाबतही विशेष खबरदारी घेतली जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790