नाशिक: २८ ते ३० ऑगस्ट सिंहस्थ ‘महाकुंभ भक्ती संगम’चे आयोजन

नाशिक। दि. २५ ऑगस्ट २०२६: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील ठक्कर डोम येथे २८ ते ३० ऑगस्ट, २०२६ या कालावधीत सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रत्येक विभागाने परस्पर समन्वय ठेवून सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेत उपाययोजना व उत्पन्नवाढीवर भर द्यावा- व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे

ठक्कर डोम येथे २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत भक्ती संगम हा कार्यक्रम होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आयुक्त श्री. सिंह बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, प्रमोद वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थासाठी साधुग्राम, मंडप व्यवस्थेचा आढावा; २०१५च्या कुंभमेळ्यातील अनुभवाचा नियोजनात उपयोग

आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले की, भक्तीसंगम कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस विविध भक्तीमय कार्यक्रम सादर होतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध संस्कृती आणि परंपरांचे दर्शन नाशिककरांना घडणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने आपल्यास्तरावर नियोजन करावे. त्यानुसार कार्यवाही करावी. या कार्यक्रमात कोणतीही त्रुटी राहणार नाही, अशी दक्षता घ्यावी, असेही आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले. यावेळी महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री, जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनीही मार्गदर्शन केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790