नाशिक: खुनाचा प्रयत्न व दंगा या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक !

नाशिक। दि. १३ ऑगस्ट २०२६: दुकान व वाहनांचा व्यवसाय चालविण्याच्या कारणावरून पैशांची मागणी करत दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फरशी, शिडी आणि फेव्हीकॉलच्या डब्याने गंभीर दुखापत केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपीला गुन्हे शाखेच्या अंबड युनिट-३च्या पथकाने अवधूतवाडी परिसरातून ताब्यात घेतले.

दि. २५ मे २०२६ रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास सत्यम प्लाय आणि रामेश्वर प्लाय या दुकानांसमोर संतोष सातदिवे व सतीश सातदिवे यांच्याकडे संशयित चेतन सुभाष गडवे, आशिष शरद जगताप आणि त्यांच्या साथीदारांनी पैशांची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने संशयितांनी संतापून दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच डोक्यात फरशी, शिडी आणि फेव्हीकॉलचे डबे मारून त्यांना गंभीर दुखापत केल्याचे पोलिसांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: १३ प्रमुख आखाड्यांपलीकडेही धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांकरीता मिळणार रु १५ लाखांपर्यंत निधी

या प्रकरणी संगिता वानखेडे (वय ४६, रा. पुणे रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेतील कलम १०९ (१), ११५, ३५२, ३५१ (२), १८९ (२), १९१ (२), १९१ (३) आणि १९० अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहराच्या 'या' भागातील वाहतूक मार्गांत महत्वाचे बदल

दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित आरोपी सागर काशिनाथ पवार (वय २९, रा. कस्तुरी किराणा दुकानाच्या बाजूला, पाण्याच्या टाकीजवळ, गजानन चौक, अवधूतवाडी, पंचवटी, नाशिक) हा अवधूतवाडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हवालदार भूषण सोनवणे व अंमलदार निकम यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा अंबड युनिट-३च्या अधिकारी व अंमलदारांनी १२ ऑगस्ट रोजी अवधूतवाडी येथे सापळा रचला.

या कारवाईत पथकाने सागर पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये शुक्रवारी (दि. १४ ऑगस्ट) रोजगार मेळाव्याचे आयोजन

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, चारूदत्त निकम, हर्षल जाधव, महेंद्र दोंदे, कुणाल पचलोरे, संजय बेनके, राजेश महाले, गौरव धात्रक व मपोअं. सविता कदम यांच्या पथकाने केली..

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790