नाशिक: मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेंतर्गत स्व-गणना पत्रक न भरलेल्या मतदारांनी 17 ऑगस्टपर्यंत भरावेत

नाशिक। दि. १२ ऑगस्ट २०२६: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या अनुषंगाने मतदार यादीतील नोंदींची अचूकता व पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी स्व-गणना पत्रक भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियांतर्गत अद्यापपावेतो 7 लाख 72 हजार 979 मतदारांनी स्व-गणना पत्रक संबंधित बीएलओ यांच्याकडून भरुन जमा केलेले नाहीत. त्यानुषंगाने नाशिक जिल्ह्यातील ज्या मतदारांनी अद्याप स्व-गणना पत्रक भरून दिलेले नाही, त्यांनी 17 ऑगस्ट,2026 पर्यंत संबंधित प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: किडनॅपिंग तसेच खंडणीच्या गुन्ह्यातील 9 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद

स्व-गणना पत्रकाद्वारे मतदारांना आपल्या मतदार यादीतील नोंदी तपासून आवश्यक माहिती सादर करता येणार आहे. मतदारांनी उपलब्ध करून दिलेली माहिती मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तसेच मयत, स्थलांतरीत अथवा दुबार नोंद असलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार असल्याने अशा प्रकरणांची माहिती संबंधित बीएलओ यांना द्यावी. अद्याप स्व-गणना पत्रक न भरलेल्या मतदारांनी निर्धारित मुदतीत ते भरून द्यावे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सोशल मीडियावरील ओळख पडली महागात; क्रिप्टो ट्रेडिंगच्या आमिषाने ८.५५ लाखांची फसवणूक

मतदारसंघातील मतदारांनी उपलब्ध ऑनलाईन सुविधेचा वापर करून गणना पत्रकातील आवश्यक माहिती अचूकपणे भरावी. आपली माहिती वेळेत सादर करून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. ऑनलाईन गणना पत्रक भरताना काही अडचण आल्यास संबंधित बीएलओ यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ज्या मतदारांना गणना पत्रक वितरित झालेले आहेत परंतु ते भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे दिले नाही त्यांनी गणनापत्रक लवकरात लवकर भरुन जमा करावेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकला आज पावसाचा ‘यलो अलर्ट’; गुरुवारपासून पुन्हा जोर वाढण्याची शक्यता

मतदाराने गणनापत्रक भरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) देण्याची व त्यांचे डिजिटायझेशन करण्याची अंतिम मुदत दिनांक 17 ऑगस्ट, असल्याने मतदारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता बीएलओ यांना आवश्यक ते सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई उपस्थित होत्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790