नाशिक जिल्ह्यातील भूकंपाबाबत जिल्हा प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

नाशिक। दि. ९ ऑगस्ट २०२६: दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री १०:०० वाजता भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदु गुजरात मधील हतगडच्या डोंगररांगा जवळ भनवड या ठिकाणी असून भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल व खोली 5 किमी नोंदवण्यात आलेली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून अत्याधुनिक भूकंप मापन केंद्र कार्यान्वित

तरी पालखेड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या धरणाची स्थिती भुकंपाच्या केंद्र बिंदुपासून पुढीलप्रमाणे:
करंजवण 22 किमी, ओझरखेड 34 किमी, व वाघाड 35 किमी, तरी मिळालेल्या माहितीनुसार अजून दुसऱ्या भूकंपाच्या धक्क्याची शक्यता दर्शवली आहे. तरी या विभागाच्या सर्व धरण अभियंता यांना पूर्ण वेळ पूर्ण लांबीत धरण निगराणी करण्याच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सोमवारी (दि. १०) विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन

शनिवारी रात्री १० वाजता झालेल्या भूकंप नंतर तूर्तास पालखेड पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी केलेल्या पूर्ण धरण लांबीत पाहणीत, करंजवण पालखेड, ओझरखेड, वाघाड, तिसगाव व पुणेगाव ह्या धरणांना कोणताही धोका निदर्शनास आलेला नाही.

पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित मोकळ्या जागेत जावे, सतर्क राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, सोशल मिडीयावर अपुर्ण अथवा चुकीची माहिती प्रसारित करू नये, प्रशासना मार्फत दिल्या जाणाऱ्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा व उचित काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790