नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

नाशिक। दि. २५ जुलै २०२६ उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका निवासी सोसायटीमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायावर मध्यवर्ती गुन्हे शाखेने छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत व्यवसाय चालवणाऱ्या मुख्य संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव जितेंद्र गणेश शेलार (वय ३६, रा. विहितगाव, नाशिक) असे आहे. उपनगर परिसरातील एका फ्लॅटमध्ये गुप्तपणे देहविक्री सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अंमलदार अतुल पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. २३) नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

पोलिसांनी प्रथम बनावट ग्राहक पाठवून मिळालेल्या माहितीची खात्री केली. त्यानंतर छापा टाकत फ्लॅटमधील देहविक्रीचा व्यवसाय उघडकीस आणला. या कारवाईदरम्यान तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी जितेंद्र शेलार याच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास चव्हाणके तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने सहभाग घेतला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790