अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

नवी दिल्ली। दि. २५ जुलै २०२६: गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकला मुसळधार पावसाचा तडाखा; गोदावरीला हंगामातील पहिला मोठा पूर, जनजीवन विस्कळीत

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. कॉकरोच जनता पार्टी आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असा इशारा देत आंदोलन आणखी तीव्र करण्याची इशारा दिला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर धरणातून १२,६०० क्युसेक विसर्ग; गोदावरीची पातळी वाढणार, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

दिल्लीतील या आंदोलनाचे लोण महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, गुवाहाटी अशा सर्वच राज्यांमध्ये पसरले होते. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढून केंद्र सरकाविरोधात असंतोष वाढत चालला होता. त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790