नाशिक। दि. २३ जुलै २०२६: भरधाव टँकरने पाठीमागून एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निवृत्ती फकिरा बोराडे (६३, रा. कलानगर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.
हा अपघात शनिवारी (दि. ११) दुपारी झाला. बोराडे हे पिंपळगाव बसवंत येथून त्यांच्या घराकडे नाशिकला येण्यासाठी दुचाकीने (एमएच. ०१ एजे. ३३२४) निघाले होते. आडगाव जवळ पाठीमागून भरधाव आलेल्या टँकरने (एनएल. ०१ एजे. ३३२४) त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने बोराडे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी टँकरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


