नाशिक: परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी मानोरी येथील शैक्षणिक संस्थेची जागा थेट खरेदीद्वारे संपादित

नाशिक। दि. २१ जुलै २०२६: सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या अनुषंगाने नाशिक शहरातील प्रस्तावित परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

दिंडोरी तालुक्यातील मौजे मानोरी येथील गट क्रमांक 123 मधील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था, नाशिक यांच्या मालकीची 0.78 हेक्टर आर क्षेत्राची जागा थेट खरेदीद्वारे यशस्वीरित्या संपादित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक : तीन लाखांचे दोन लॅपटॉप असलेली बॅग अवघ्या दोन तासांत परत; सरकारवाडा पोलिसांची तत्परता आणि रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

सदर जमीन शैक्षणिक संस्थेच्या मालकीची असल्याने थेट खरेदीद्वारे भूसंपादन करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मा. धर्मादाय सहआयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनी प्रदान केली. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित जागेची थेट खरेदी करण्यात आली. संस्थेच्या वतीने अध्यक्ष कोंडाजी रावबा आव्हाड तसेच सरचिटणीस हेमंत हरीभाऊ धात्रक यांनी खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक सहकार्य केले. यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने कार्यकारी अभियंता संदीप पांडागळे उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790