नाशिक: घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; पतीला धमकी देत संशयित फरार

नाशिक। १९ जुलै २०२६: नाशिकरोड परिसरातील उपनगर भागात एका विवाहित महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास महिला घरात एकटी असताना एक अनोळखी व्यक्ती तिच्या घरी आली. संबंधिताने आपण तिच्या पतीच्या ओळखीचे असल्याचे सांगत घरात प्रवेश केला.

महिलेने पती घरी नसल्याचे सांगून नंतर येण्यास सांगितले. मात्र, संशयिताने तिचा हात पकडून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. महिला आरडाओरडा करू लागल्याने त्याने तिचे तोंड दाबून तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

याचदरम्यान महिलेचा पती घरी परतल्याने संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला. जाताना त्याने पतीला, “गाडीवर बस, मग तुझ्याकडे बघतो,” अशी धमकी दिली आणि दुचाकीवरून फरार झाला.

या घटनेप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790