नाशिक: शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास 22 जुलैपर्यंत मुदतवाढ

नाशिक। दि. १७ जुलै २०२६: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यात 15 शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत. या वसतिगृहांत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 22 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण नाशिकचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: स्मार्ट मीटरची मिळणार उपयुक्त माहिती; शनिवारी (दि. १८) ग्राहक संवाद मेळावे

प्रवेश प्रक्रियेनुसार इयत्ता 11 वी, 12 वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी 50 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व ज्यांना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज सन 2026-27 साठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी भरणे बंधकारक आहे. तसेच गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी विद्यार्थ्यांला शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास स्वाधार योजनेचा अर्ज करता येईल. जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत त्यांना वसतिगृह व स्वाधार या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृहाचे गृहप्रमुख व गृहपाला यांच्याकडे सादर करावेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जवाहर नवोदय विद्यालयाची 28 नोव्हेंबरला निवड चाचणी परीक्षा; जिल्ह्यात 40 केंद्रावर परीक्षेचे आयोजन

अधिक माहितीसाठी संबंधीत वसतिगृहाचे गृहप्रमुख/ गृहपाल व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक कार्यालयात संपर्क साधावा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790