एमसीईडीत २७ जून रोजी ज्ञानवृद्धी व आर्थिक साक्षरता विषयक मोफत कार्यशाळा

नाशिक। दि. २५ जून २०२६: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील उद्योजक, स्टार्टअप्स तसेच स्वयंरोजगार इच्छुकांना आर्थिक नियोजन आणि वित्तीय व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), नाशिक येथे शनिवार, २७ जून २०२६ रोजी ‘ज्ञानवृद्धी व आर्थिक साक्षरता’ या विषयावरील मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सहा तासांत २० मिमी पावसाची नोंद; पुढील चार दिवस पावसाचा अलर्ट !

ही कार्यशाळा महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, मुंबई यांच्या वतीने तसेच जागतिक बँक आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (MoMSME) यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या RAMP (Raising and Accelerating MSME Performance) योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, ११ उद्योग भवन, आयटीआय सिग्नलजवळ, त्र्यंबक रोड, नाशिक येथे होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नीट व जेईई परीक्षा मोफत कोचिंगकरिता 30 जून पर्यंत अर्ज सादर करावेत

कार्यशाळेत आर्थिक व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वे, आर्थिक नियोजनाचे महत्त्व, आर्थिक विश्लेषण, व्यवसाय आराखड्यात वित्तीय नियोजनाचा समावेश, वित्तीय व्यवस्थापनाचे विविध पैलू तसेच आर्थिक जोखमीचे व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. एमएसएमई क्षेत्रातील उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयंरोजगाराची तयारी करणारे युवक तसेच उद्योग व्यवस्थापनातील आर्थिक नियोजनाचे ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना या कार्यशाळेचा लाभ घेता येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नांदूरमध्यमेश्वर येथे २८ जून ला 'पावसाळापूर्व पक्षी गणना' होणार

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी उद्यम नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, टी.सी. आणि दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी मोहिनी गांगुर्डे (कार्यक्रम आयोजक) – 8766738318, आरती शेलोरकर (जिल्हा प्रकल्प समन्वयक) – 9168667167 किंवा आलोक मिश्रा (विभागीय अधिकारी) – 9168667151 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790