नाशिक: भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक। दि. २० जून २०२६: नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२६ करीता जे उमेदवार पात्र आहेत, अशा उमेदवारांना नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या ऑफलाईन प्रशिक्षणाकरीता भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आवार, नाशिक) येथे विनामूल्य प्रवेश देण्यात येत आहेत, असे या केंद्राचे संचालक डॉ. मालोजीराव स. भोसले, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गणेश वळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची शेतकऱ्यांना माहिती द्यावी- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

या केंद्रात पात्र उमेदवारांचे प्रशिक्षण नागरी सेवा मुख्य परीक्षेपर्यंत राहील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरीता संस्थेत किंवा दूरध्वनी ०२५३-२२३०१०० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच आपला प्रवेश अर्ज २३ जून २०२६ पर्यंत iasnasik@gmail.com या ई- मेलवर किंवा प्रत्यक्ष या कार्यालयात सादर करावा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790