Amazon

पुणे येथे दोन कोटी रुपयांचा अपहार करून फरार झालेल्या आरोपीला नाशिकमधून अटक !

नाशिक। १६ जून २०२६ : पुण्यातील एका नामांकित गृहप्रकल्पातील ३२ ग्राहकांची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेल्या मुख्य संशयिताला गंगापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने नाशिकमधून अटक केली. गंगापूर रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये लपून बसलेल्या सायमन रॉनी पीटर (रा. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.

गुन्हा घडल्यानंतर संशयिताने आपला मोबाईल बंद करून नाशिकमध्ये आश्रय घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शेरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा माग काढला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी शहराच्या 'या' विविध मार्गातील वाहतुकीत शुक्रवारी (दि. २५) महत्वाचे बदल...

पोलिसांनी गंगापूर रोडवरील ट्रिबो सफायर हॉटेलमधील खोली क्रमांक ३०१ मध्ये संशयित वास्तव्याला असल्याची खात्री केली. त्यानंतर घनश्याम भोये, रवींद्र मोहिते, गिरीश महाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजनबद्ध कारवाई करत त्याला अटक केली. पुढील तपासासाठी संशयिताला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रविवार कारंजा परिसरात FDAची धडक कारवाई; ६,६५९ किलो गूळ जप्त; भेसळ व निकृष्ट दर्जाचा संशय

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील ‘गंगा फर्नहिल’ या गृहप्रकल्पातील फ्लॅट विक्री आणि ग्राहकांशी समन्वय साधण्याची जबाबदारी सायमन पीटर याच्याकडे होती. प्रकल्पातील फ्लॅट विक्रीतून मिळणारी रक्कम कंपनीच्या अधिकृत बँक खात्यात जमा करण्याऐवजी त्याने ती आपल्या मित्र बी. चंद्रशेखर यांच्या नावाने उघडलेल्या कथित बनावट खात्यात वळविल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे ३२ ग्राहकांची एकूण दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये मुलींचे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 7 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

या प्रकरणी ९ जून रोजी पुण्यातील काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. तपासादरम्यान पुणे पोलिसांनी संशयिताच्या किया कारचा क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नाशिक पोलिसांना उपलब्ध करून दिला होता. संबंधित कार हॉटेलच्या पार्किंगमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांच्या वेशात परिसरात प्रवेश केला. त्यानंतर संशयिताच्या खोलीत जाऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790