नाशिक: एस.टी. बसस्थानक परिसरात २०० मीटर ‘नो पार्किंग झोन’ची प्रभावी अंमलबजावणी

नाशिक। दि. ९ जून २०२६: राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी वाहतुकीचा परिणाम होत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता, वाहतूक शिस्त आणि एस.टी.च्या महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने नाशिक विभागात बसस्थानकांपासून 200 मीटर परिसरात ‘नो पार्किंग झोन’ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. 4 जूनपासून सुरू झालेली ही विशेष मोहीम 15 जूनपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्य परिवहन नाशिक विभाागाचे वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी भगवान घुगे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  घरफोडीप्रकरणी अल्पवयीन ताब्यात; सोन्या-चांदीसह एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत

राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध बैठकींमध्ये अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एस.टी.च्या महसुलात घट होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व विभागांना विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या मोहिमेंतर्गत बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्थानिक पोलीस आणि आरटीओच्या सहकार्याने कारवाई केली जात आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षक श्रीमती माधुरी सोनार या कारवाईसाठी सहकार्य करीत असून 4 व 5 जून 2026 रोजी 6 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा 'येलो अलर्ट' !

जिल्ह्यात वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री. घुगे आणि विभाग नियंत्रक सचिन शिरसागर यांच्या नेतृत्वाखाली विभागीय वाहतूक अधिकारी, सर्व आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख तसेच स्थानिक पोलीस यांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

नाशिक विभागातील नवीन मध्यवर्ती बसस्थानक, मेळा बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, नाशिकरोड, त्र्यंबकेश्वर, सातपूर, येवला, सटाणा, देवळा, नामपूर, ताहाराबाद, मनमाड, चांदवड, नांदगाव, सिन्नर, नांदुरशिंगोटे, लासलगाव, निफाड, कळवण, वणी, नांदुरी, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, इगतपुरी, घोटी, मालेगाव आणि पिंपळगाव या बसस्थानकांच्या परिसरात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस व आरटीओच्या मदतीने 200 मीटर ‘नो पार्किंग झोन’ची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री. घुगे यांनी दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790