नाशिक। दि. २७ मे २०२६: बकरी ईद सणानिमित्त ईदगाह मैदानावर गुरुवारी (दि. २८) नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांची होणारी गर्दी लक्षात घेता त्र्यंबकरोड आणि परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर पोलिस वाहतूक शाखेने सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल केले आहेत. या काळात काही मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
हे मार्ग बंद: लोकशाहीरअण्णाभाऊ साठे पुतळा ते जलतरण तलाव सिग्नल या मार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद. गडकरी चौक ते चांडक सर्कल या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे बंद राहील.
पर्यायी मार्ग: त्र्यंबक पोलीस चौकीकडून येणारी वाहने उजवीकडे वळून ठाकरे गल्ली, शालीमार आणि मेनरोडमार्गे इतरत्र जातील. चांडक सर्कल येथून जाणारी वाहने संदीप हॉटेल, मुंबई नाकामार्गे पुढे मार्गस्थ होतील.
![]()

