नाशिक: बँकेतून बोलत असल्याचे भासवत वृद्धाच्या खात्यातून ९५ हजार लांबवले

नाशिक। दि. १३ मे २०२६: बँक अधिकाऱ्याचे सोंग घेऊन सायबर भामट्यांनी एका ८० वर्षीय वृद्धाची तब्बल ९५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकला उष्णतेचा कहर... यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४२ अंशांवर तापमान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काठे गल्ली परिसरात राहणाऱ्या वृद्धाला दुपारी साडेदोनच्या सुमारास अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगत, “तुमच्या खात्यात चुकीने ५ हजार रुपये जमा झाले आहेत,” असे सांगितले. त्यानंतर संबंधिताने मोबाईलवर एक स्कॅनर पाठवून यूपीआय पिन टाकण्यास सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्र उकाड्याने घामाघूम, पुढील ५ दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अलर्ट.. जाणून घ्या सविस्तर…

वृद्धाने सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करताच त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन व्यवहाराद्वारे ९५ हजार रुपये काढून घेण्यात आले. मोबाईलवर पैसे वजा झाल्याचे मेसेज आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला. सायबर फसवणुकीच्या या प्रकरणाचा अधिक तपास भद्रकाली पोलिस करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790