नाशिक शहरातील ‘या’ भागांत मंगळवारी (दि. १२) वीजपुरवठा बंद राहणार

नाशिक। दि. ११ मे २०२६: विद्युत पुरवठा वीज वाहिन्या देखभाल व दुरुस्तीसाठी ११ के.व्ही. एकदंत विद्युत वाहिनीवर मंगळवारी १२ मे २०२६ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकला उष्णतेचा कहर... यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४२ अंशांवर तापमान

वीज पुरवठा बंद राहणारे भाग:
सदर कालावधीत कमल नगर, बोडके नगर, त्र्यंबक नगर, शिवकृपा नगर , त्रिकोणी बंगला परिसर, कालिका नगर, कळस्कर नगर , माने नगर, केके वाघ कॉलेज, धात्रक फाटा आणि साईनगर परिसरातील वीजपुरवठा टप्याटप्प्याने खंडित राहील. ग्राहकांनी कृपया याची नोंद घेऊन सहकार्य करावे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790