उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेचा इशारा; आठवडाभर यलो अलर्ट

मुंबई, दि. १२ मे २०२६: राज्यातील तापमानात पुन्हा वाढ होत असून भारतीय हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवर उष्ण व दमट हवामान कायम असताना राज्यातील अनेक भागांत नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

सोमवारी अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी वारे यंदा नियोजित वेळेपेक्षा सुमारे तीन दिवस आधी अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. १५ ते १६ मेदरम्यान मान्सूनच्या आगमनाची चिन्हे दिसू शकतात, असे हवामान विभागाने स्पष्ट केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट:
मंगळवार व बुधवार: नाशिक, जळगाव, धुळे
, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुरुवार व शुक्रवार: अमरावती, अकोला आणि नागपूर जिल्ह्यांत उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

दरम्यान, नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, थेट उन्हात जाणे टाळणे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790