नाशिक: कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील चार संशयितांना आज न्यायालयात हजर करणार

नाशिक। दि. ५ मे २०२६: कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील चार संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी आणि रझा रफिक मेमन अशी संशयितांची नावे असून, त्यांना मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १६६/२०२६ अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महापौर, पोलीस आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांची काळाराम मंदिराला भेट व पाहणी

या प्रकरणात संशयितांविरुद्ध लैंगिक अत्याचार, विनयभंग तसेच धर्मांतरासंदर्भातील गंभीर आरोप नोंदविण्यात आले आहेत. संबंधित आरोपींविरुद्ध मुंबईनाका पोलिस ठाण्यात सात, तर देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात एक असे एकूण आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

यापूर्वी, सातव्या गुन्ह्याच्या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशानुसार २३ एप्रिल रोजी संशयितांना मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पुढे २ मे रोजी झालेल्या सुनावणीत कोठडीची मुदत वाढवून ५ मेपर्यंत करण्यात आली होती. आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790