नाशिक: थॅलेसिमीया मुक्त संकल्प सप्ताहानिमित्त नाशिक जिल्हा रुग्णालयातर्फे कार्यक्रम

नाशिक। दि. ४ मे २०२६: ‘एक पाऊल थॅलेसिमीया मुक्तीकडे’ या अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त जिल्हा रुग्णालयात संकल्प सप्ताहाचा शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांच्या हस्ते झाला. ८ मे २०२६ पर्यंत हा सप्ताह राबविण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील ४२ फिर्यादींना एकूण दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल परत !

या सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात जनजागृती, शपथ, आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग, निबंध स्पर्धा, शिबिरांचा समावेश आहे. या अभियानादरम्यान १८ ते ३५ वर्षे वयोगटातील युवक- युवती, विवाह निश्चित झालेल्या जोडप्यांची रक्त तपासणीवर भर देण्यात येणार आहे.

थॅलेसिमीया हा टाळता येणारा आजार असून वेळेत तपासणी आणि औषधोपचार करून घेतल्यास त्यावर प्रभावी उपाययोजना असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिंपी यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790