नाशिक: RTO कडून 89 डम्पर वाहनांवर 6.5 लाख रूपयांची दंडात्मक कारवाई

नाशिक। दि. ३० एप्रिल २०२६: वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विना क्रमांक प्लेट, विना रिफ्लेक्टर, विना टेल लाईट/ ब्रेक लाईट चालणाऱ्या डम्पर वाहनांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक मार्फत 21 एप्रिल 2026 पासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल

या मोहिमेत 89 डम्पर वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एकूण रूपये 6 लाख 66 हजार 200 इतका दंड ठोठवण्यात आला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. नियमाचे उल्लंघन करून वाहन चालवू नये अन्यथा मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक मार्फत कळविण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790