नाशिक। दि. २२ एप्रिल २०२६: नाशिकरोड परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या मोटारसायकलीने दिलेल्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा नारायण धने (रा. अस्वले मळा, एकलहरा रोड) आणि त्यांचे पती नारायण धने हे मजूर दांपत्य नाशिकरोड येथून भाजीपाला घेऊन आपल्या घरी परतत होते. यावेळी एकलहरा रोडवरील कुंदन लॉन्सजवळ पाठीमागून वेगात आलेल्या एमएच २१ सीए ९९०६ क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात नारायण धने यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार अवधूत भीमराव कांबळे (रा. दत्तनगर, चुंचाळे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत. (नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २७८/२०२६)
![]()

