शासकीय कामकाजात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर वाढवावा- अपर मुख्य सचिव विकास खारगे

नाशिक। दि. १८ एप्रिल २०२६: नागरीकांना जलद व पारदर्शकपणे सेवा देण्यासाठी शासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर कृत्रिम बुध्दीमत्तेचा अधिक वापर करावा असे आवाहन महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल विभागाची आढावा बैठक अपर मुख्य सचिव खारगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, मालेगावचे अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, नाशिकच्या अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवणच्या प्रकल्प अधिकारी कश्मीरा संखे, इगतपुरी- त्र्यंबकेश्वरचे सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ जी.व्ही.एस. पवनदत्ता, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) कुंदन हिरे आदि उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती

यावेळी बोलतांना अपर मुख्य सचिव खारगे म्हणाले की, शासकीय कामकाज गतीने होण्यासाठी तसेच कामाकाजातील प्रलंबितता कमी करण्यासाठी ई ऑफिस प्रणालीचा वापर वाढला पाहिजे. महसुल विभागाच्या सेवा नागरीकांना सहज उपलब्ध व्हाव्यात, याकरीता महसुल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या शिबिरांच्या माध्यमातून महसुल विभागाच्या सेवा नागरीकांना एकाच छताखाली मिळत असल्याने नागरीकांचा वेळ, श्रम व पैसा वाचण्यास मदत होत आहे. पहिल्या टप्प्यात हे अभियान ग्रामीण भागात राबविण्यात आले आहे. महसुल विभागाने हे अभियान प्रभावीपणे राबविल्याबद्दल त्यांनी जिल्ह्यातील सर्व महसुल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच तीन महिन्यानंतर या अभियानाचा दुसरा टप्पा सुरु करण्यात येणार असून हे अभियान शहरी भागात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एस.टी. बसस्थानक परिसरात २०० मीटर 'नो पार्किंग झोन'ची प्रभावी अंमलबजावणी

यावेळी त्यांनी ई-कार्यालय (e-office) प्रणालीचा प्रभावी वापर करून फाईल निपटारा जलद करण्याच्या सूचना सर्व यंत्रणेला दिल्या. तसेच नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये यासाठी सर्व अर्जांची वेळेत व पारदर्शक पद्धतीने पूर्तता करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी ई-पीक पाहणी, पाणंद रस्ते, ॲग्रीस्टॅक नोंदणी, फेरफार नोंदी, महापार पोर्टल, वनहक्क दावे, इमारत बांधकाम आदी विषयांसह महसूल विषयक इतर कामांचाही आढावा घेतला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा- पोलिस महासंचालक सदानंद दाते

या बैठकीस उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, शुभांगी भारदे, रविंद्र भारदे, राजेंद्र वाघ, महेश जमदाडे, किरण नाईक, जिल्हा खणीकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790