नाशिक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘भीमगर्जना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक। दि. १३ एप्रिल, २०२६: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘भीमगर्जना’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भीम गीतांची संगीतमय मानवंदना अर्पण करून डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक सादरीकरणापुरता मर्यादित नसून, समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जाणीव करून देणारा प्रेरणादायी उपक्रम आहे. डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या सामाजिक परिवर्तनातील योगदानाचा आढावा संगीत व सादरीकरणाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

हा कार्यक्रम सोमवार, दि. १३ एप्रिल, २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता श्रीकृष्ण बँक्वेट लॉन्स हॉल, बोधले कंपाऊंड, हॉटेल इरा जवळ, नाशिक पुणे रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमात कलाकार विष्णु शिंदे व सहकलाकार, स्नेहल किर्तीने व सहकलाकार तसेच विजयराज निकम व सहकलाकार सहभागी होणार असून, त्यांच्या सादरीकरणातून भीम गीतांची सुरेल मैफल रंगणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकार होत असून, सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790