कलिंगडाच्या दरावरून वाद चिघळला; विक्रेत्याच्या मुलाकडून ग्राहकावर प्राणघातक हल्ला

नाशिक। दि. ११ एप्रिल २०२६: कलिंगडाच्या दरावरून झालेल्या किरकोळ वादाने गंभीर स्वरूप धारण करत विक्रेत्याच्या मुलाने ग्राहकावर वजनाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड परिसरात घडली आहे. या घटनेत जखमी व्यक्ती थोडक्यात बचावली असून प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

ही घटना दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात घडली. गांगुर्डे नावाच्या महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. त्या आपल्या मुलासह फळे खरेदीसाठी गेल्या असताना कलिंगडाच्या किमतीवरून विक्रेत्यासोबत वाद झाला.

इरफान बागवान आणि अली बागवान या बापलेकांकडे कलिंगडाचा भाव विचारल्यानंतर दर जास्त असल्याने ग्राहक पुढे निघाला. यावेळी संशयितांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याने वाद वाढला. त्यानंतर दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

दरम्यान, अली बागवान याने हातातील वजन उचलून महिलेच्या मुलाच्या डोक्यात प्रहार केला. डोक्याला मार लागल्याने तो खाली कोसळला. पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो थोडक्यात टळला. संबंधित वजन डोक्याला जोरात लागले असते, तर गंभीर परिणाम झाले असते. या प्रकरणी पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790