नाशिक: प्रादेशिक परिवहन विभाग थकबाकीदारांना ‘एआय’च्या माध्यमातून पाठविणार संदेश

नाशिक। दि. १० एप्रिल २०२६: प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक अंतर्गत एआय तंत्रज्ञानाचा वापर करून मोटार वाहन थकीत कर असलेल्या वाहनांच्या मालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविणार आहे. त्यासाठी १६ एप्रिल २०२६ पर्यंत संबंधित पात्र संस्थांनी दरपत्रक सादर करावे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक अंतर्गत एआय तंत्रज्ञानाचा वापर करून मोटार वाहन थकीत कर असलेल्या वाहनांच्या मालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एआय कॉल असिस्टंट द्वारे कराचा भरणा करणे, वाहन तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या वाहनांसाठी वाहनांची कागदपत्रे उदा. कर, विमा, पीयूसी, तंदुरुस्ती प्रमाणपत्र वैधता समाप्त झालेल्या वाहनांच्या मालकांना कागदपत्रे वैध करण्याबाबत अवगत करणे, थकीत कर भरणा ऑनलाइन पद्धतीने करावा, असा संदेश देण्याकरीता दरपत्रक मागविण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

अटी व शर्थी अशा : अशा स्वरुपाची सेवा शासकीय कार्यालयात पुरविण्याबाबतचा पूर्वानुभव असावा, या सेवेत मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांचा समावेश असावा. दरपत्रकाची रक्कम जीएसटीसह सादर करावी. दरपत्रके विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास विचारात घेण्यात येणार नाही. दरपत्रके मूळ स्वरुपात (टपालाद्वारे) अथवा प्रत्यक्षात कार्यालयास सादर करावीत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

दरपत्रक पाठविण्याचा पत्ता असा : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेठ रोड, पंचवटी, नाशिक- ४२२००४

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790