व्यावसायिक गॅस, प्रीमिअम पेट्रोल, विमान इंधन महागले

नवी दिल्ली। दि. २ एप्रिल २०२६: विमान इंधन, व्यावसायिक एलपीजी सिलिंडर व प्रीमिअम पेट्रोलच्य दरांत मोठी वाढ करण्यात आली आहे.

देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी इंधन दरात ८.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, आता प्रतिकिलोलिटरसाठी १,०४,९२७ रुपये मोजावे लागतील विदेशी विमान कंपन्यांसाठी हा दर ११४.५ टक्क्यांनी वाढून दोन लाख रुपयांच्य पार गेला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानप्रवास महागण्याची शक्यता आहे

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: माडसांगवीत कोयता घेऊन दहशत माजवणारा जेरबंद

हॉटेल आणि उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या १९ किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत १९५.५० रुपयांची वाढ झाली. या वाढीमुळे हॉटेलमधील जेवण महागण्याची चिन्हे आहेत. ‘एक्स्ट्रा ग्रीन’ डिझेल १.५० रुपयांनी वाढून ९२.९९ रुपये, तर १००-ऑक्टेन पेट्रोल (एक्सपी-१००) ११ रुपयांनी वाढून १६० रुपये लिटर झाले आहे. घरगुती स्वयंपाकाचा गॅस आणि साध्या पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790