नाशिक: अशोक खरातला शिताफीने पकडणाऱ्या पोलीस पथकाचा सत्कार !

नाशिक। दि. २४ मार्च २०२६: महिलांवरील अत्याचारांच्या गंभीर आरोपांमुळे राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाचा पर्दाफाश करणाऱ्या नाशिक शहर पोलिसांच्या कामगिरीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात विशेष कौतुक केले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व त्यांच्या पथकाने प्रकरणाची सखोल चौकशी करत पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुढील ३ ते ५ दिवसांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

या प्रकरणात खरातचे काही प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याची चर्चा असतानाही पोलिसांनी निर्भीडपणे तपास करत त्याचे गैरकृत्य एकामागोमाग उघड केले, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कौतुकानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सोमवारी (दि. २३) गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान केला. उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा- पोलिस महासंचालक सदानंद दाते

खरातच्या गैरकृत्यांची व अश्लील व्हिडिओंची माहिती समोर आल्यानंतर आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त किरण चव्हाण यांनी गुंडाविरोधी पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने सापळा रचत अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली. एका बंगल्यात चोरीसाठी कोणी शिरल्याची बनावट माहिती देत संशयिताला ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर खरातला अटक करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. १० जून) वीजपुरवठा बंद राहणार…

या कारवाईत सहभागी असलेल्या विजयकुमार सूर्यवंशी, अविनाश देवरे, प्रदीप ठाकरे आणि राज राठोड यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पीडित महिलांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धीर दिला. कुटुंबातील सदस्याप्रमाणे विश्वास देत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पोलिसांकडून सुरक्षेची हमी मिळाल्यानंतर अनेक महिला पुढे येत तक्रार दाखल करण्यास तयार झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790