नाशिक: भरदिवसा घरफोडीत ६.७४ लाखांचा ऐवज लांबवला

नाशिक। दि. १९ मार्च २०२६: बंद घराचा दरवाजा आणि सेफ्टी डोअरचे लॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले ६.७४ लाखांचे सोन्याचे दागिने व रक्कम चोरी केली. दुपारी १ वाजेच्या सुमारास फलाह सोसायटी, टाकळीरोड, काठे गल्ली येथे हा प्रकार उघडकीस आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक : अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणात ८ जणांवर गुन्हा; १५८ सिलिंडर जप्त

याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जिग्नेष कारिया (रा. गंगापूररोड) यांनी तक्रार दिली. भाऊ हितेश कारीया कार्यक्रमानिमित्त कुटुंबासह बाहेर गेला असता फ्लॅटचे बंद दरवाजा आणि सेफ्टी डोअरचा कडीकोयंडा कशानेतरी तोडून घरात प्रवेश करत चोरी करण्यात आली. सोसायटीमध्ये फेरीवाल्याकडून रेकी करुन बंद फ्लॅट हेरत घरफोडी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरात अनोळखी फेरीवाल्यांना परवानगीशिवाय प्रवेश न देण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790