नाशिक: सिलेंडर बुकिंगनंतर २ ते ३ दिवसांत वितरण; नागरिकांनी एजन्सींवर गर्दी न करण्याचे आवाहन

नाशिक। दि. १४ मार्च २०२६: घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगनंतर साधारणतः २ ते ३ दिवसांत सिलेंडर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येतील, नागरिकांनी गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सध्या काही ठिकाणी गॅस वितरणाबाबत संभ्रम निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थिती स्पष्ट केली आहे. गॅस वितरणाची प्रक्रिया नियमितपणे सुरू असून नागरिकांनी संयम राखून अधिकृत माध्यमातूनच सिलेंडर बुकिंग करावे, असेही सांगण्यात आले आहे. ज्या ग्राहकांनी अद्यापपर्यंत KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी तातडीने KYC करून घ्यावी. त्यामुळे गॅस वितरण प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जनगणना 2027 स्वगणनेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

दरम्यान, संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने गॅस वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गॅस वितरणासंदर्भात काही अडचण असल्यास नागरिकांनी (0253) 2317151 या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  एप्रिलमध्येच उष्णतेचा कडाका; राज्यात तापमानाचे उच्चांक, ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट

नागरिकांनी गॅस सिलेंडर बुकिंगसाठी उपलब्ध असलेल्या डिजिटल व दूरध्वनी सुविधांचा वापर करून घरबसल्या बुकिंग करावे व गॅस एजन्सींवर अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे.

गॅस बुकिंगसाठी उपलब्ध सुविधा:
एचपीसीएल (HPCL)

  • व्हॉट्सअप बुकिंग – 9222201122
  • मिस्ड कॉल बुकिंग – 9493602222
  • HP Pay App द्वारे बुकिंग
  • कॉल बुकिंग – 8888823456
  • ऑनलाईन – www.hindustanpetroleum.com⁠ / myhpgas.in
  • इतर माध्यम – GPay, PhonePe, Amazon Pay
🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' मार्गावरील वाहतुकीत पुढील तीन महिने महत्वाचे बदल

आयओसीएल (IOCL)

  • व्हॉट्सअप बुकिंग – 7588888824
  • मिस्ड कॉल बुकिंग – 8454955555
  • SMS/IVR – 7718955555
  • ऑनलाईन – cx.indianoil.in
  • इतर माध्यम – GPay, PhonePe, Amazon Pay

बीपीसीएल (BPCL)

  • व्हॉट्सअप बुकिंग – 1800224344
  • मिस्ड कॉल बुकिंग – 7710955555
  • IVRS – 7715012345 / 7718012345
  • Hello BPCL App
  • ऑनलाईन – www.bharatgas.com⁠ / bharatpetroleum.in
  • इतर माध्यम – GPay, PhonePe, Amazon Pay

याव्दारे नागरिकांना बुकींग करता येईल असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790