नाशिक: जागतिक किडनी दिनानिमित्त अपोलो हॉस्पिटल्सचा गुरुवारी (दि. १२) ‘निरामय जीवन विजय सोहळा’ !

नाशिक। दि. ११ मार्च २०२६: जागतिक किडनी दिनानिमित्त नाशिक येथील अपोलो हॉस्पिटल्सच्या वतीने विशेष प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील यशस्वी किडनी प्रत्यारोपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अपोलो हॉस्पिटल्सच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून समाजात किडनी आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

“निरामय जीवन विजय सोहळा – निरोगी किडनीद्वारे” या कार्यक्रमात अपोलो हॉस्पिटल्समध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर निरोगी व आनंदी जीवन जगत असलेल्या २०० हून अधिक रुग्णांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. प्रत्यारोपणानंतर नवजीवन मिळालेल्या रुग्णांच्या अनुभवांमधून इतर रुग्णांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

याशिवाय लोकज्योती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विवाहाच्या ५० वर्षांचा सुवर्णमहोत्सव पूर्ण केलेल्या ५० ज्येष्ठ दांपत्यांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांचे सदस्यही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारे, श्री विठ्ठल माऊलीच्या वारीचा अनुभव देणारे ‘पालखी’ हे नामांकित नाटक सादर करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

किडनी आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनही या कार्यक्रमात मिळणार आहे. डॉ. प्रकाश उगले (किडनी रोग व किडनी प्रत्यारोपण तज्ञ) आणि डॉ. प्रवीण गोवर्धने (किडनी प्रत्यारोपण सर्जन) हे किडनीचे आजार, त्यांचे प्रतिबंध, उपचार आणि प्रत्यारोपण प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण माहिती देणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

हा कार्यक्रम गुरुवार, दि. १२ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.१५ वाजता कालिदास कलामंदिर, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रेरणादायी कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अपोलो हॉस्पिटल्स, नाशिकच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790