नाशिक: गोडाऊनमधील ४.५ लाखांच्या वायर चोरीचा उलगडा; दोघे जेरबंद !

नाशिक। दि. ११ मार्च २०२६: राका कॉलनी परिसरातील गोडाऊनमधून लाखो रुपयांच्या वायर चोरीच्या प्रकरणाचा गुन्हे शाखेने छडा लावून दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून वायर व दुचाकी असा एकूण १ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या संदर्भात मिशाल सुभाष शहा (वय ३५, रा. राका कॉलनी, राजीव गांधी भवन, नाशिक) यांनी ५ मार्च २०२६ रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या गोडाऊनमधून २ ते ४ मार्च दरम्यान अज्ञात पाच जणांनी सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या पॉलीकॅब कंपनीच्या वायरचे बंडल चोरी करून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती

या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या अंबड युनिट-३ कडून सुरू असताना ९ मार्च रोजी पोलीस हवालदार प्रकाश बोडके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आनंदवली परिसरात दोन संशयित चोरीच्या केबल वायरचे बॉक्स पांढऱ्या रंगाच्या गोणीत भरून निळ्या रंगाच्या अॅक्टिवा दुचाकीवरून विक्रीसाठी येणार आहेत.

या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काळे नगर, विवेकानंद नगर व आनंदवली परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानंतर प्रतिक मनोज येवले (वय १९, रा. एन-४२/सीसी-२/१३/४, त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक) व लकी विल्सन भंडारी (वय २०, रा. बेथलनगरी, रचना स्कूलच्या मागे, नाशिक) यांना ९ मार्च रोजी रात्री सुमारे १०.५५ वाजता ताब्यात घेण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुढील ३ ते ५ दिवसांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

त्यांच्या ताब्यातून ७७ हजार ५०० रुपये किमतीच्या पॉलीकॅब कंपनीच्या वायर तसेच ९० हजार रुपये किमतीची अॅक्टिवा दुचाकी असा एकूण १ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे सदर चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

दरम्यान, आरोपी लकी विल्सन भंडारी हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात (गु.रं.नं. २१९/२५) मागील सहा महिन्यांपासून फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा- पोलिस महासंचालक सदानंद दाते

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षिरसागर, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, पोलीस अंमलदार चारूदत्त निकम व महिला पोलीस अंमलदार सविता कदम नेमणुक गुन्हे शाखा अंबड युनिट-३ यांनी केली आहे. तसेच स्मार्ट सिटी कॅमेरा हाताळणारे भुषण खैरनार यांचे कामगिरीत विशेष सहकार्य लाभले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790