नाशिक: लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाचे देशवंडीत आज ( दि.८) होणार भूमिपूजन

नाशिक। दि. ७ मार्च २०२६: सिन्नर तालुक्यातील मौजे देशवंडी येथे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारक बांधकामाचे भूमिपूजन रविवार, ८ मार्च, २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महाराष्ट्र शासन विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) सुहास कांदे, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

तरी या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यास 8 मार्च, 2026 रोजी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. नांदगावकर यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790