नाशिक: रंगपंचमीनिमित्त रविवारी (दि. ८) शहरातील ‘या’ महत्वाच्या वाहतूक मार्गांत बदल !

नाशिक। दि. ७ मार्च २०२६: रंगपंचमी व पारंपरिक रहाड उत्सव निमित्त रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी पंचवटी व जुने नाशिक परिसरात मोठ्या उत्साहात रहाड उत्सव साजरा केला जाणार आहे. बुधा हलवाई दुकानासमोरील होळी, मधली होळी, जुनी तांबट लेन, दंडे हनुमान मंदिर (काझीपुरा पोलीस चौकीसमोर), तसेच दिल्ली दरवाजा व पंचवटीतील शनि चौक येथील पेशवेकालीन रहाड येथे मोठ्या प्रमाणात भाविक/नागरिक सहभागी होतात.

या पार्श्वभूमीवर भाविक व नागरिकांची गर्दी व वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी, अपघात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नाशिक शहर पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष निर्बंध लागू केले आहेत.

यानुसार दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

🚫 ‘शनि चौक रहाड’ उत्सवकरीता सकाळी ६ ते रात्री ८ वा. पावेतो ‘प्रवेश बंद’ मार्ग:
👉 काळाराम मंदिरकडुन शनि चौकात येणारा मार्ग.
👉 खांदवे सभागृहाकडुन शनि चौकात येणारा मार्ग.
👉 मालवीय चौकातुन शनि चौकात येणारा मार्ग.
👉 सरदार चौकाकडुन शनि चौकात येणारा मार्ग.

⤴️ पर्यायी मार्ग:
👉 रामकाल पथाचे कार्य चालु असल्याने अंतर्गत पर्यायी मार्ग उपलब्ध नाहीत तरी बाहय पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

🚧 बॅरिकेटींग पॉईंट:
👉 काळाराम मंदिर उत्तर दरवाजा.
👉 खांदवे सभागृह.
👉 मालवीय चौक.
👉 सरदार चौक.

🚫 ‘दिल्ली दरवाजा रहाड’ उत्सवकरीता सकाळी ६ ते रात्री ८ वा. पावेतो ‘प्रवेश बंद’ मार्ग:
👉 नेहरू चौकाकडुन दिल्ली दरवाजा मार्गे म्हसोबा पटांगण कडे येणारा मार्ग.
👉 म्हसोबा पटांगणकडुन (छोटा पुलावरून) दिल्ली दरवाजा मार्गे मेनरोड कडे जाणारा रस्ता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

⤴️ पर्यायी मार्ग:
👉 सदर मार्गावरील वाहने हे दहि पुलावरून जातील.
👉 सदर मार्गावरील वाहने हे शितळादेवी मंदिराकडुन दहि पुलावर चढुन मेनरोडकडे जातील.

🚫 ‘बुधा हलवाई चौक, मधली होळी, जुनी तांबट लेन, व दंडे हनुमान मंदिर’ येथील रहाड / रंगपंचमी उत्सवकरीता सकाळी ९ ते रंगपंचमीचा कार्यक्रम संपे पावेतो ‘प्रवेश बंद’ मार्ग:
👉 नेपाळी कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा.
👉 बादशाही कॉर्नर ते बुधा हलवाई दुकान व मधली होळी.
👉 नेहरू चौक ते बुधा हलवाई दुकान.
👉 दूध बाजार आणि जुनी तांबट लेन.
👉 हाजी टी पॉईंट ते चौक मंडई ते काजीपुरा पोलीस चौकी.
👉 छत्रपती शिवाजी महाराज चौक ते काजीपुरा पोलीस स्टेशन (दंडे हनुमान मंदिर).
👉 मिरजकर गल्ली ते काझीपुरा पोलीस चौकी (दंडे हनुमान मंदिर).
👉 सांगली बैंक सिग्नल ते खडकाळी सिग्नल पर्यंत.
👉 धुमाळ पॉईंट ते गाडगे महाराज पुतळयाकडे येणारा रस्ता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

⤴️ पर्यायी मार्ग:
👉 नेपाळी कॉर्नर कडुन खडकाळी सिग्नल मार्गे जातील.
👉 दुधबाजार ते बादशाही कडे जाणारी वाहतुक ही दुधबाजार, खडकाळी मार्गे जातील.
👉 गजराज चौक, पाटील गल्ली मार्गे इतरत्र जातील.
👉 दुध बाजार कडुन पिंजार घाट मार्गे इतरत्र जातील.
👉 मुल्तानपुरा, पिंजारघाट दुधबाजार मार्गे इतर जातील.
👉 मिरजकर गल्ली कडुन उमराव मेडीकल मार्गे जातील.
👉 आरके कडुन खडकाळी सिग्नलकडे जाणाऱ्यांना पर्यायी मार्ग सागंली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल मार्गे जातील.
👉 सांगली बॅक सिग्नल, मेहर सिग्नल, सिबीएस मार्गे जातील.
👉 धुमाळ पॉईंट, सांगली बॅक सिग्नल, मेहर सिग्नल मार्गे जातील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790