नाशिक: मिशन लक्षवेध योजनेंतर्गत क्रीडा प्रकारानुसार 20 खेळाडूंची निवड होणार

नाशिक। दि. ५ मार्च २०२६: राज्यातील क्रीडा संस्कृतीला जागतिकस्तरावर शासनाच्या वतीने मिशन लक्षवेध योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या अंतर्गत ऑलिम्पिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या 12 क्रीडा प्रकारांचा समावेश असून जिल्ह्यासाठी मैदानी, धनुर्विद्या, नेमबाजी व रोइंग या चार क्रीडा प्रकारांसाठी प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

यासाठी खेळाडूंनी 20 मार्च 2026 पर्यंत परिपूर्ण अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळाली असून अर्ज विभागीय क्रीडा संकुल, सर्व्हे क्रमांक 195, हिरावाडी रोड, पंचवटी, नाशिक 422003 येथे कार्यालयीन कामाकालाच्या दिवशी जमा करावेत, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा, नाशिक विभागाच्या उपसंचालक स्नेहल साळुंखे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

मिशन लक्षवेध ही योजना त्रिस्तरीय असून राज्य स्तरावर हाय पर फॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्टस एक्सलन्स सेंटर व जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशा प्रकारे राहणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी विभागीय स्पोर्टस एक्सलन्स सेंटर देण्यात आले आहे. अर्जदार खेळाडू हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 25 वर्षाआतील खेळाडू मुले/ मुली अर्ज करू शकतात.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत दोन वर्षांचा क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे 3 छायाचित्र, बोनाफाईड प्रमाणपत्र व पालकांचे समंतीपत्र इत्यादी कागदपत्र आवश्यक आहे. राज्यस्तरावरील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभागी खेळाडू (SGFI, AFI, Khelo India national only) अर्ज करण्यास पात्र आहेत. गत दोन वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येवून क्रीडा कौशल्य व तंदूरूस्त (Fitness) चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त डॉक्टरकडून दिलेले वैध वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

निकष पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची निवड तज्ज्ञ समितीद्वारे करण्यात येणार असून त्यांचा निवास, भोजन, सप्लीमेंटस्, किट आणि प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च योजनेंतर्गत केला जाणार असल्याचेही उपसंचालक श्रीमती साळुंखे यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790