नाशिक: ‘सावाना’त शनिवारी (दि. २१) ‘स्वर-सावाना’चे १९ वे पुष्प; गायिका आयेशा मुखर्जी यांचे सादरीकरण

नाशिक। दि. २० फेब्रुवारी २०२६: शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने आयोजित ‘स्वर-सावाना’ (पुष्प १९ वे) या उपक्रमांतर्गत शनिवारी, २१ फेब्रुवारी रोजी सायं. ६.१५ वाजता सावाना परिसरातील औरंगाबादकर सभागृहात शास्त्रीय गायनाचा विशेष कार्यक्रम रंगणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात उष्णतेचा कडाका आणि वादळी पावसाचा इशारा

या कार्यक्रमात ‘स्वरांगण’ प्रस्तुत, ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांची पट्टशिष्या आणि कोलकाता येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आयेशा मुखर्जी यांचे सादरीकरण होणार आहे. त्या बंदिश, गझल, भाव-नाट्यगीत आणि अभंग अशा विविध संगीतप्रकारांचा सुरेल मेळ श्रोत्यांसमोर सादर करणार आहेत.

कार्यक्रमात तबल्यावर संगीत कुलकर्णी तर हार्मोनियमवर अभिजित भाटजिरे हे साथसंगत करणार असून, रसिकांना दर्जेदार शास्त्रीय संगीताचा आनंद अनुभवता येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  उन्हाळी सुट्ट्यांसाठी रेल्वे विशेष गाड्या चालविणार

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून श्री गुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष प्रवीण बुरकुले व डॉ. अतुल पुराणिक उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावाना अध्यक्ष दिलीप फडके हे विराजमान राहणार आहेत.

या सांगीतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावानाचे पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदस्यांनी नाशिककर नागरिक व रसिक श्रोत्यांना केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790