शुक्रवारपासून दहावीची परीक्षा

नाशिक/पुणे। दि. १९ फेब्रुवारी २०२६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८ लाख ६५ हजार ७४० मुले, ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर आहेत.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

एकूण ५ हजार १११ मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण २३,६८३ शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. १८ मार्च रोजी शेवट होणार आहे. बारावी परीक्षेत घडलेल्या कॉपी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बैठे पथक वाढवण्यावर भर दिला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790