नाशिक: ‘मनी लॉन्डरिंग’मध्ये अटकेची धमकी; सायबर भामट्यांकडून नऊ लाखांचा गंडा

नाशिक, दि. १४ फेब्रुवारी २०२६: मनी लॉन्डरिंग प्रकरणात संशयित असल्याची भीती दाखवत सायबर भामट्यांनी एका नागरिकाची तब्बल नऊ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला वेगवेगळ्या दोन मोबाईल क्रमांकांवरून कॉल करण्यात आले. व्हॉट्सअॅपद्वारे व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव ‘बालसिंग राजपूत’ असल्याचे सांगत तो क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे भासविले. संबंधित व्यक्तीने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक ‘नरेश गोयल मनी लॉन्डरिंग प्रकरणात’ संशयित म्हणून आढळल्याचा दावा केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

तसेच, अटकेपासून वाचायचे असल्यास आपल्या बँक खात्यातील रक्कम त्यांनी सांगितलेल्या खात्यांमध्ये तत्काळ वर्ग करण्यास सांगितले. भीतीपोटी फिर्यादीने विविध खात्यांमध्ये एकूण नऊ लाख रुपये जमा केले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये व वॉलेटमध्ये वर्ग झाली, त्या खातेदारांसह संबंधित मोबाईल क्रमांकधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पिसे करीत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. कोणतीही शंका असल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790