नाशिक: सोशल मीडियावर ओळख; शेअर्स गुंतवणुकीच्या नावाखाली १०.३८ लाखांची फसवणूक

नाशिक। दि. ११ फेब्रुवारी २०२६: सोशल मीडियावर आलेली एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. शेअर्स व फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत संशयितांनी संबंधित व्यावसायिकाची तब्बल १० लाख ३८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत सोशल मीडियावरून एका महिलेने व्यावसायिकाशी संपर्क साधला. विश्वास संपादन केल्यानंतर तिने स्वतःला नामांकित कंपनीतील शेअर्स ब्रोकर्स असल्याचे सांगून मोबाईलवर संवाद सुरू केला. ‘मिंगकॉईन क्लाउड’ नावाच्या संकेतस्थळावर फॉरेक्स ट्रेडिंगद्वारे अधिक नफा मिळेल, असे सांगत तिने लिंक पाठवली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

यानंतर विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास कसा नफा मिळू शकतो, याची माहिती देत व्यावसायिकाला वेगवेगळ्या बँक खात्यांत रक्कम भरण्यास सांगण्यात आले. नफा झाल्याचे दाखवणारे स्क्रीनशॉट आणि गुंतवणूकदारांचा ग्रुपही दाखवून विश्वास वाढवण्यात आला. ग्रुपमधील काही सदस्यांनी नफ्याचे अनुभव शेअर केल्याने व्यावसायिकाने अधिक गुंतवणूक केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

मात्र, नफा झालेल्या शेअर्सची विक्री करण्याची मागणी केल्यानंतर संशयितांकडून टाळाटाळ सुरू झाली. बाजार घसरल्याचे कारण पुढे करत व्यवहार पूर्ण न केल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले. पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790