नाशिक: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावकार अटकेत

नाशिक। दि. ६ फेब्रुवारी २०२६: कर्जवसुलीसाठी सातत्याने तगादा लावत कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावकार भारत रामदास लोखंडे (वय ३१, रा. वैदुवाडी, शिंदे गल्ली) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाणे येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

या प्रकरणी श्वेता फुलसुंदर यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या पती संदीप फुलसुंदर यांनी आरोपीकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. परतफेड केल्यानंतरही आणखी एक लाख रुपयांची मागणी करत आरोपीकडून वारंवार तगादा लावण्यात येत होता. पैसे न दिल्यास पती व कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून संदीप फुलसुंदर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे पोलिसांत नोंदवण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

तपासादरम्यान सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अक्षय गांगुर्डे व विजय सूर्यवंशी यांच्या पथकाने आरोपीचा माग काढत तो अगर टाकळी परिसरात असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर पथकाने कारवाई करून आरोपीस अटक केली. पुढील तपासासाठी त्याला उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790