नाशिक: शहीद सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वाटप

नाशिक। दि. ३ फेबुवारी २०२६: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक आणि प्रोजेक्ट वीर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शहीद सैनिकांचे पाल्य व इतर एकूण 121 जणांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचे 18 लाख 50 हजार रूपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे (निवृत्त) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन आज सकाळी करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रोजेक्ट वीरचे संस्थापक धिरज धारोड, आर्टिलरी सेंटर नाशिकचे ब्रिगेडियर एन.आर.पांडे, प्रोजेक्ट वीरचे कर्नल वाय. व्ही. सुरी यांच्यासह वीर नारी व पाल्य उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

या उपक्रमामुळे शहीद सैनिकांच्या व इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक आधार मिळून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल श्री सोनवणे यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790