नाशिक: तपोवन वृक्षतोड प्रकरणी १७ फेब्रुवारीला सुनावणी, मनपाने लेखी हमी देण्याची मागणी

नाशिक। दि. २० जानेवारी २०२६: सिंहस्थासाठी तपोवनातील १८२५ झाडे तोडण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर आता १७फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

२७ जानेवारीला होणाऱ्या सुनावणीवेळी महाराष्ट्र शासन आणि नाशिक महापालिकेने तयारीसाठी वेळ मागितल्याने ही मुदत वाढवण्यात आली. याचिकेकर्ते अॅड. निखिल पंडित यांनी न्यायालयात महत्त्वाची मागणी केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

महापालिका तपोवनातील ‘भारत मंडपम’ (माइस) प्रकल्प रद्द करण्याचा दावा करत असेल, तर तसे पुरावे किंवा लेखी हमी न्यायालयात सादर करावी, असे त्यांनी म्हटले आहे. या सुनावणीकडे नाशिककर पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागून आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790