हुतात्मा दिन; शासकीय कार्यालयांत आज ११ वाजता दोन मिनिटे मौन पाळणार

नाशिक। दि. ३० जानेवारी २०२६: देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ शुक्रवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता संपूर्ण राज्यात दोन मिनिटे मौन पाळून हुतात्मा दिन पार पडेल, असे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: खंडणीखोर सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

सकाळी १०.५९ ते ११.०० वाजेदरम्यान इशारा भोंगा वाजवण्यात येणार असून, त्यानंतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, तसेच अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळावे, असे आवाहन शासनाने केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790