नाशिक: डा‍क विभागाची 2 फेब्रुवारीला पेन्शन अदालत; निवृत्तीवेतनधारकांनी 28 जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

नाशिक। दि. २७ जानेवारी २०२६: डाक विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रवर अधीक्षक डाक कार्यालयात 2 फेब्रुवारी, 2026 रोजी सकाळी 11 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने पेन्शन व परिवार पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींनी विहित नमुन्यातील आपले अर्ज 28 जानेवारी 2026 पर्यंत कार्यालयात सादर करावेत, असे नाशिक डाकघर विभागाचे वरिष्‍ठ प्रवर अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

या पेन्शन अदालतीमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे, ई वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टी.बी.ओ.पी/एम.ए.सी.पी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे, धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या तसेच डी. पी. सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. त्याचप्रमाणे 28 जानेवारी 2026 या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पेन्शन अदालत मध्ये अंतर्भाव केला जाणार नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

अर्जाचा विहित नमुना टपाल कार्यालयात उपलब्ध असून संबंधितांनी मुदतीत आपले निवृत्ती वेतनासंबंधित तक्रारी अर्ज प्रवर अधीक्षक डाक घर, नाशिक विभाग, जी. पी. ओ आवार, नाशिक -422001 या पत्त्यावर वेळेत सादर करावेत, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790