Amazon

महाराष्ट्रावर शोककळा: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन

बारामती। दि. २८ जानेवारी २०२६: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. बारामती येथे विमानाचे लँडिंग होत असताना अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की विमान जळून खाक झाले आहे.

आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या चार सभा होणार होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. सुपे जिल्हा परिषद गटासाठीही एक सभा होणार होती.

🔎 हे वाचलं का?:  लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नाशिक परिक्षेत्रात 1 नाव्हेंबरपर्यत दक्षता जनजागृती सप्ताह

यासाठी अजितदादा पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790