लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट आली समोर, जाणून घ्या सविस्तर…

मुंबई। दि. १३ जानेवारी २०२६: महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देण्यास हरकत नसली, तरी जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट नकार दिला आहे.

🔎 हे वाचलं का?:  मनपाची आज महासभा; विकास कामांसह विविध विषयांवर होणार चर्चा

“मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारीचे एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार,” अशा स्वरूपाच्या वृत्तांमुळे आयोगाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयांची वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना दिले होते.

मुख्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले की, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करताना आयोगाने एकत्रित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्षात सुरू झालेल्या विकासकामांप्रमाणेच योजनाही आचारसंहिता काळात सुरू ठेवता येतात.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ योजनेतून ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य- आयुक्त डॉ. किरण पाटील

या पार्श्वभूमीवर आयोगाने स्पष्ट केले आहे की, ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित लाभ देणे मान्य असले तरी कोणताही हप्ता अग्रिम स्वरूपात देता येणार नाही. तसेच आचारसंहिता कालावधीत नवीन लाभार्थ्यांची निवड करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790