नाशिक: शहर पोलिसांचा १०२ टवाळखोरांना कायदेशीर दणका !

नाशिक। दि. १३ डिसेंबर २०२५: मिशन क्लिन सिटी मोहिमेत अंतर्गत उपनगर पोलिसांनी अचानक केलेल्या मिशन टवाळखोर कारवाईमध्ये १०२ टवाळखोरांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणून समज दिली.

पुन्हा टवाळखोरपणा करतांना आढळल्यास पुढील कारवाईत आढळून आल्यास ‘कायद्याचा बालेकिल्ला’मध्ये हजर करण्याची तंबी देत प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. शुक्रवारी (दि. १२) रात्री ८ ते १० या कालावधीत ही कारवाई करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिककरांची पाण्यासाठी वणवण; पाण्याच्या टँकर- जारच्या दरांवर नियंत्रणच नाही

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत टवाळखोरीच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त संगीता निकम, वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या पथकाने उपनगर परिसरात अचानक कोंबिंग कारवाई करत विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांना ताब्यात घेतले. जागेवर दंडुक्याचा प्रसाद देत पोलिस ठाण्यात आणून समज देण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790