पुढील 24 तास महत्त्वाचे ! महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता; 17 जिल्ह्यांना IMD चा येलो अलर्ट !

देशाच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषतः उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब ,हरियाणा ,चंदीगड या भागात प्रचंड पावसासह वादळी वारे वाहत आहेत. दरम्यान आजपासून राज्यभरातील पावसाचा जोरही वाढणार आहे. आज मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट आहे .

नवी दिल्ली। दि. २ सप्टेंबर २०२५: भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालचा उपसागरावर सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे .येत्या 24 तासात हे वारे वायव्य दिशेला सरकणार असून वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे . त्यामुळे मध्य महाराष्ट्र कोकण व गोवा किनारपट्टीसह मराठवाडा व विदर्भात तुफान पावसाची हजेरी लागणार आहे . गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला होता .आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही हा जोर कायम राहणार आहे .

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये डेंग्यूचा डंख; १० सप्टेंबरपासून ३०० हून अधिक पथकांची तपासणी मोहीम

पुढील चार दिवस कसे जाणार ?
हवामान विभागाने आज पासून पुढील चार दिवस महाराष्ट्रात विविध ठिकाणी हाय अलर्ट दिले आहेत . आज विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे .तर संपूर्ण मराठवाडा उर्वरित विदर्भ व नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात हवामान विभागाने आज येलो अलर्ट दिला आहे . कोकण किनारपट्टीवरही आज जोरदार पावसाची शक्यता असून पुणे सातारा व कोल्हापूर घाट माथ्यावरही येलो अलर्ट देण्यात आलाय .

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दत्तक प्रक्रियेला नवी दिशा; ८ बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब

3 सप्टेंबर : सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच पुणे सातारा कोल्हापूर घाटमाथ्यावर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट आहे .मुंबई, ठाणे, पालघर ,नाशिक, अहिल्यानगर ,पुणे, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे .

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

4 सप्टेंबर : रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे पुणे, सातारा व कोल्हापूर तसेच नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट. सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे ,नंदुरबार व संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .

5 सप्टेंबर : रायगड व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज कलर असून मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा व नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट आहे. नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे . उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही .

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790